कोल्हापूर - जिल्ह्यातील उदगावचा (ता. शिरोळ) सुपुत्र, सध्या मुंबई येथील विक्रोळी पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत पोलिस उपनिरीक्षक सचिन दिनकर पाटील (वय ४१) यांचा गुरुवारी (९ जुलै) कोरोनाने मृत्यू झाला. पाटील यांची पत्नी व मुलगा यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर उदगाव येथे शोककळा पसरली आहे.
पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वृद्ध सेवानिवृत्त वडील दिनकर गुरुजी, आई, भाऊ, भावजय असा परिवार आहे. चार दिवसांपासून त्यांना त्रास होऊ लागल्यानंतर उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा एक लहान भाऊ सन २०१० साली पोलिस सेवेत असताना त्यांची निवड पोलिस उपनिरीक्षक पदी झाली होती.
नाशिक येथे ट्रेनिंग सुरू असताना हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते. पाटील कुटुंबावर सचिन यांच्या मृत्यूने दुसरा आघात झाला. उदगाव येथे शोककळा पसरली आहे.