कुख्यात गुंड विकास दुबे याला मध्य प्रदेशच्या उज्जैनहून कानपूरला आणले जात होते. यावेळी एसटीएफच्या गाड्यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला. याच गाडीत विकास दुबे बसलेला होता. अपघातानंतर विकास दुबेनं एसटीएफच्या एका अधिकाऱ्याच्या हातातला पिस्तुल हिसकावून घेतला आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
यावेळी विकास दुबेनं पोलिसांवर गोळीबार केला. तो पळून जात असलेला पाहून पोलिसांनीही त्याच्यावर प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या दरम्यान झालेल्या चकमकीत विकास दुबे ठार झाला, अशी माहिती कानपूर पोलिसांनी दिली आहे. कानपूरमध्ये आठ पोलिसांच्या हत्याकांड प्रकरणी कुख्यात गँगस्टर दुबे याला गुरुवारी सकाळी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे अटक केली होती.