एका ४३ वर्षीय महिलेला मार्क डेनिलसन नावाच्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. तिने ही मैत्री स्वीकारली. दोघांमध्ये चॅटिंग सुरु झाले. मार्कने महिलेचा विश्वास संपादन करुन तिच्याशी ओळख वाढवली. नंतर त्याने आपला नंबर देऊन ही चर्चा व्हॉट्सअॅपवर सुरु केली. या महिलेनेही त्याच्यावर विश्वास ठेवत अवांतर चॅट सुरु ठेवलं. त्यानंतर डेनिलसनने या महिलेला तो लग्न करण्यासाठी भारतात येणार आहे असं सांगितलं.
त्यासाठी त्याने एक पार्सल भारतात पाठवले असून कस्टममध्ये अडकले आहे, असे सांगितले. नंतर या महिलेला कस्टमधून हे साहित्य सोडवण्यास विनंती केली. या महिलेने डेनिलसनचे साहित्य सोडवण्यास होकार दिला. अन् तेथेच घात झाला. एका महिलेने तिला फोन करुन सुरुवातीला १५ हजार रुपये भ्ररायला सांगितले. नंतर तब्बल ११ लाख रुपये भ्ररायला लावले. नंतर आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.