इयत्ता दहावीच्या परीक्षेत 96.91 टक्के मुली, तर 93.90 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. गुरुवारपासून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन तसेच स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. गुण पडताळणीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान, तर छायाप्रतींसाठी 18 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
विभागनिहाय टक्केवारी खालीलप्रमाणे
कोकण - 98.77 टक्के
पुणे - 97.34 टक्के
कोल्हापूर - 97.64 टक्के
मुंबई - 96.72 टक्के
अमरावती - 95.14 टक्के
नागपूर - 93.84 टक्के
नाशिक - 93.73 टक्के
लातूर - 93.09 टक्के
औरंगाबाद - 92 टक्के
(image source : gettyimages)