दहावीचा ऑनलाईन निकाल आज दुपारी

मुंबई - महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्ट, तर छायाप्रतींसाठी 18 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी मंगळवारी ही माहिती दिली आहे. 


कोरोना संसर्गाच्या संकटामुळे यंदा दहावी परीक्षेतील भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला होता. तसेच लॉकडाऊन कालावधी वाढत गेल्यामुळे पेपर तपासणीचे काम विलंबाने झाले. रद्द केलेल्या पेपरच्या गुणप्रदानाचा निर्णय होण्यासही कालावधी गेला. त्यामुळे यंदा निकाल जाहीर करण्यास देखील उशीर झाला आहे.

येथे पहा निकाल - 

१) www.mahresult.nic.in 
(येथे वेगवेगळी सांख्यिकी माहितीही असेल)

२) www.sscresult.mkcl.org

३) www.maharashtraeducation.com

४) www.mahahsscboard.in 
(येथे शाळांना एकत्रित निकाल मिळेल)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !