अबब ! नगर जिल्ह्यात २४ तासात ५३५ रुग्ण

शनिवारी २७९ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर - जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजले पासून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत ५३५ ने वाढ झाली आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३४, अँटीजेन चाचणीत २८४ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या २१७ रुग्णांचा समावेश आहे. 


यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १७९५ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज २७९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ३६३९ इतकी झाली. काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत २४ रुग्ण बाधित आढळून आले होते. 

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०९ नेवासा १३, जामखेड ०२ अशा २४ रुग्णांचा समावेश होता. त्यानंतर आणखी १० रुग्णांचा अहवाल बाधित आढळून आला. यात, नेवासा ०१- चांदा, अहमदनगर शहर-०२, अकोले ०७- शेरणखेल ०४, रेडे ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज  २८४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर २७, राहाता ०९, पाथर्डी २५, नगर ग्रामीण १५, श्रीरामपुर १२,  कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २०, श्रीगोंदा ६०, पारनेर १७, राहुरी ०६, शेवगाव ४३, कोपरगाव १२, जामखेड २२ आणि कर्जत ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २१७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १७५, संगमनेर ०५, राहाता १३, पाथर्डी ०४, नगर ग्रामीण ०५, श्रीरामपूर ०४, कॅन्टोन्मेंट ०१, नेवासा ०१, श्रीगोंदा ०१, पारनेर ०४, शेवगाव ०२, कोपरगाव ०१ आणि कर्जत येथील ०१ रुग्णांचा समावेश आहे.
      
बरे झालेली रुग्ण संख्या - ३६३९
उपचार सुरू असलेले रूग्ण - १७९५
आतापर्यंत एकूण मृत्यू - ७४
एकूण रूग्ण संख्या - ५५०८

 
STAY HOME STAY SAFE

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या
अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा
खोटी माहिती पसरवू नका; पसरू देऊ नका !
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !