आता मुलीही वडिलांच्या संपत्तीत समान वाटा

नवी दिल्ली - आता मुलींनाही वडिलांच्या संपत्तीत समान वाटा मिळेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सन २००५ मध्ये अस्तित्त्वात आलेल्या नवीन हिंदू उत्तराधिकार कायदा येण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असला तरीही हा वाटा मिळणार आहे.


आता मुलीचा वडिलांच्या मालमत्तेतही समान वाटा असेल. त्यामुळे मुलीला वाटा मिळवण्याचा हक्क असल्याचे कोर्टाने सांगितले आहे. मुलींनाही पुत्रांसारखे समान अधिकार मिळायला हवेत. मुलगी आयुष्यभर प्रेमळ असते. तिचे वडील जिवंत असोत किंवा नाही, ती नेहमी सहभागीदार बनलेली राहिल. 

तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने याप्रकरणी अनेक याचिकांवर सुनावणी केली होती. सुधारित कायद्यात मुलींना उत्तराधिकारमध्ये समान हक्क देण्याचा अधिकार आहे की नाही, असे या याचिकेत म्हटले होते.

भारतात हिंदू कायद्याच्या दोन पद्धती आहेत. मिताक्षर आणि दायभाग. दायभाग देशांच्या सिमित तर मिताक्षर जास्तीत जास्त भागांमध्ये आहे. दोघांमधील मुख्य फरक उत्तराधिकार आणि संयुक्त कुटुंब प्रणालीबद्दल आहे. मिताक्षर मालमत्ता विचलनाच्या दोन पद्धती, उत्तरजीविता व उत्तराधिकार प्रणालीविषयी आहे. 

उत्तरजीविताचा नियम संयुक्त कुटुंबाच्या संपत्तीवर लागू होतो आणि उत्तराधिकारी नियम मृतांच्या मालकीच्या स्वतंत्र मालमत्तेवर लागू होतात. दायभाग पध्दती केवळ एका पध्दतीच्या उत्तारधिकाऱ्याला मान्यता देते. आता मात्र मुलींनाही समान वाटा मिळणार आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !