मुंबई - प्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांचे न्युमोनिया आणि कोरोनामुळे निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राहत इंदौरी कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढळले त्यांना रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
यानंतर त्यांना लागोपाठ तीन हार्टअटॅक आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.राहत इंदोरी चार महिन्यांपासून केवळ रुटीन चेकअपसाठी बाहेर पडत होते. त्यांना चार-पाच दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. डॉक्टरांच्या सल्ल्यावर एक्सरे करण्यात आला होता.
त्यांना निमोनियाचे निदान झाले. यानंतर सँपल तपासण्यासाठी पाठवण्यात आले. यामध्ये ते पॉझिटिव्ह आढळले. त्यांना हृदयरोग आणि मधुमेह देखील होता. त्यांना दोन्ही फुफ्फुसांमध्ये निमोनिया होता. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आयसीयूत ठेवले होते.
राहत इंदौरी यांचा जन्म १ जानेवारी १९५० मध्ये मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये झाला होता. त्यांनी बरकतुल्लाह यूनिव्हर्सिटीमधून उर्दूमध्ये एमए केले होते. भोज यूनिवर्सिटीने त्यांना उर्दू साहित्यात पीएचडी प्रदान केली होती. राहत यांनी मुन्नाभाई एमबीबीएस, मीनाक्षी, खुद्दार, नाराज, मर्डर, मिशन कश्मीर, करीब, बेगम जान, घातक, इश्क, जानम, सर, आशियां आणि मै तेरा आशिक या चित्रपटांमध्ये त्यांनी गीते लिहिली होती.