चीनविरुद्ध नागरिकांच्या नकारात्मक विचारामुळे विविध कंपन्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. यावर्षी आयपीएल सामन्यांमध्ये जाहिरातींवर व्हिवो व ओपेने सर्वाधिक खर्च केला होता. परंतु, त्यांचा हा खर्च आता पाण्यात जाणार आहे. गेल्या वर्षी टीव्ही आणि डिजिटल जाहिरातीतून स्टार इंडियाला २२०० कोटी रुपये मिळाले होते. व्हिवो व ओपेने गेल्या वर्षी जाहिरातीवर २४० कोटी रुपये खर्च केले होते.
यंदा मात्र, आयपीएल स्पर्धेच्या काळात चीनला अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आयपीएलसोबतच प्रो कबड्डी लीगच्या मुख्य प्रायोजकातून देखील व्हिवो कंपनीने बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेही कोरोना विषाणूच्या संसंर्गाच्या भीतीने यंदा आयपीएल स्पधेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तरीही परदेशात ही स्पर्धा होत असून यंदा मात्र जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न कमीच असणार आहे.