हुश्श ! अखेर त्या एसपींची मुक्तता झाली..

मुंबई - नैराश्यामुळे आत्महत्या केलेल्या अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी पटना शहराचे एसपी विनय तिवारी मुंबईत आले होते. परंतु, मुंबई पोलिसांनी त्यांना क्वारंटाईन केले होते. आज मात्र त्यांची क्वॉरंटाइनमधून मुक्तता करण्यात आली आहे. विनय तिवारी यांनी मुंबईत आल्यानंतर लगेचच पालिकेने क्वॉरंटाइन केले होते. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. 

सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी त्याच्या वडिलांनी बिहारमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलिसांचे पथक मुंबईत आले आहे. या पथकाने तपास सुरू केला होता. पण काही दिवसानंतर लगेचच एसपी विनय तिवारी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आले. त्यानंतर मात्र घडामोडी बदलत गेल्या. मुंबईच्या पालिकेने एसपी तिवारी यांनाच क्वारंटाईन केले. 

तिवारींना क्वारंटाईन केल्यानंतर माेठा गहजब झाला. तिवारी यांना पालिकेने १४ दिवसांसाठी होम क्वॉरंटाइन केले होते. तसेच त्यांना या १४ दिवसात बाहेर जाण्यास मज्जाव केलेला होता. या घटनेचे मोठे राजकीय पडसाद उमटले. यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही नाराजी व्यक्त केली होती. मुंबई प्रशासनाच्या वर्तणुकीवर त्यांनी आक्षेप घेतला होता. मुंबई पोलीस बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा आरोप करण्यात आला होता. 
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !