तमाशा, संंगीतबारी सुरु करा.. अन् आम्हाला जगू द्या !

तमाशा फड मालक कलावंत विकास महामंडळाची मागणी

मुंबई - लॉकडाऊन कालावधीत कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम होत नसल्याने लोककलावंताचे नुकसान होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लोककलावंताना लोककला सादर करण्याची परवानगी मिळावी, संगीतबारी आणि तमाशा असे वेगवेगळे प्रकार करण्यात यावेत, अशी मागणी तमाशा फड मालक कलावंत विकास महामंडळाने मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.

आपल्या लोककलेतून समाजात विविध विषयांवर जागृती निर्माण करण्याबरोबरच समाजाचे प्रबोधन करणाऱ्या लोककलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितले.

मंत्रालयात आमदार अतुल बेनके, सांस्कृतिक कार्यचे संचालक बिभीषण चवरे यांच्यासह महाराष्ट्र राज्य तमाशा फड मालक कलावंत विकास महामंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अभिनेते सुशांत शेलार यांच्यासह लोककलावंत मालती इनामदार, राजू बागुल, शांताबाई संक्रापूर, राजू गायकवाड, शफी भाई शेख उपास्थित होते.

अमित देशमुख म्हणाले, राज्यातील कोविड-19 परिस्थिती पाहता सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. राज्यातील कलाकारांना उभारी देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असून लोकनाट्य सादर करणाऱ्या कलाकारांनी मांडलेल्या विविध अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून कोविड-19 मुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊन कालावधीत कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम होत नसल्याने लोककलावंताचे नुकसान होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लोककलावंताना लोककला सादर करण्याची परवानगी मिळावी, संगीतबारी आणि तमाशा असे वेगवेगळे प्रकार करण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

विविध योजनांचा लाभ मिळावा, लोककलावंताच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे, लोककलावंतासाठी कल्याणकारी मंडळ असावे, कलावंताना मिळणारे अनुदान वेळेत मिळावे, लोककलावंतासाठी विमा योजना आणि आरोग्य योजना असाव्यात अशा काही मागण्यांचे निवेदन यावेळी सांस्कृतिक मंत्री देशमुख यांना देण्यात आले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !