अहमदनगर - नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथे गेले आठ दिवसांपासून दररोज दमदार पावसाची हजेरी लागत आहे. हा पाऊस इतका झाला आहे की आता या परिसरातील शेतकऱयांच्या विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या आहेत.
घोडेगाव येथील प्रगतशील शेतकरी अर्जुनराव बरहाटे यांच्या शेतात असलेली विहिर देखील पावसाच्या पाण्यामुळे काठोकाठ भरली आहे. इतकेच नाही तर कठडे ओलांडून विहिरीतील पाणी वाहत आहे. या व्हिडिओत आपण हे दृश्य पाहू शकता.