अशी साजरी झाली महात्मा गांधी जयंती

शेतकरी, कामगार विरोधी कायद्याविरोधात कॉग्रेसकडून निदर्शने

शेवगाव: राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे  शेतकरी व कामगार बचाव दिन साजरा केला. मोदी सरकारने शेतकरी व कामगारांच्या विरोधात जे काळे कायदे पारित केले त्याचा काँग्रेसने राज्यभर धरणे व निदर्शने करून निषेध व्यक्त केला . तसेच हे काळे कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून शेवगाव तालुका काँग्रेस व अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीने शेवगाव येथिल कृषी उत्पन्न बाजारसमिती समोर धरणे देऊन निदर्शने केली . 

त्याप्रसंगी तालुकाध्यक्ष डॉ अमोल फडके व जिल्ह सचिव प्रा शिवाजी काटे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच पक्षाच्या भूमिकेचे निवेदन तहसीलदार अर्चना पागिरे यांना दिले. 

केंद्रशासनाने प्रचंड गोंधळाच्या वातावरणात आवाजी मतदानाच्या जोरावर कोणतीही चर्चा न करता असंवैधानिक पद्धतीने शेतकरी विरोधी विधेयके मंजूर करून घेतली. या घटनेचा अहमदनगर जिल्हा काँग्रेस व तालुका काँग्रेस तर्फे धरणे व निदर्शने या  माध्यमातून जाहीर विरोध व निषेध करण्यात आला. 

याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विरोधी विधेयकाला विरोध करत असल्याचे जिल्हा सचिव प्रा. शिवाजी काटे व तालुकाध्यक्ष डॉ अमोल फडके  यांनी सांगितले. या नवीन कृषी विधेयकानुसार  कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे  अस्तित्व व व्यापारी, आडत दुकानदार यांच्यावरील  नियंत्रण संपुष्टात आणून खाजगी व्यापारी, दलाल,नबडे व्यापारी यांच्या दावणीला बळीराजा बांधला जाईल, अशी भीती आहे. 

तसेच, बहुराष्ट्रीय कंपन्या शेतकरी मालावर डल्ला मारण्याची, कृषी करारावर नियंत्रण नसणे, शेतकरी फसवणूक झाल्यास दाद मागण्याची प्रक्रिया सुलभ नसणे, जीवनावश्यक वस्तू नियमांत बदल करून  साठेबाजीवरील नियंत्रण पूर्ण काढून घेऊन शेतकरी व सर्वसामान्य ग्राहक यांची लूट होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचे म्हणजे या विधेयकानुसार किमान आधारभूत किंमत प्रणाली कालांतराने संपुष्टात आणून बळीराजालाच बळी देण्याच्या प्रकारास खतपाणी घालणारे हे विधेयक असल्याने याचा संपूर्ण देशभरात शेतकरी वर्ग व काँग्रेस पक्षातर्फे विरोध होत असल्याचे निवेदकांतर्फे सांगण्यात आले. 

याप्रसंगी अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे सचिव शिवाजी काटे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अमोल फडके, रियाज शेख, उपाध्यक्ष किशोर कापरे, संजय जोशी यांनी निवेदन दिले. यावेळी पांडुरंग नाबदे, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष बब्बूभाई शेख, युवक काँग्रेस अध्यक्ष कृष्णा डमाळ, धनंजय डहाळे, अशोक पंडित, जब्बार शेख, दिलीप कवडे, अशोक  पिसाळ, रवी लांडे, अस्लम पठाण, अंकुश महाराज गायकवाड, अशोक वंजारी, सुरेश निकाळजे, प्रताप काटकर, दशरथ धावणे, श्रीकृष्ण बर्डे, पांडुरंग वीर, बाजीराव अंगरख, शोएब पठाण आदी उपस्थित होते.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !