एनसीसी सोल्जर फ्रंट 21 उमेदवारांसह मैदानात
प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र पॅनल उभारणार
गावचे ऋण फेडण्यासाठी उच्च शिक्षित मैदानात
शेवगाव : वर्षानुवर्षे प्रलंबीत शेवंगावकरांचे निकराचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी नगरपरिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत सर्वच्या सर्व 21 जागांवर उमेदवार उभे करून अख्खा पॅनलच मैदानात उतरविण्याचा निर्णय एनसीसी सोल्जर फ्रंटने घेतला आहे. त्यामुळे आधीच ऐनवेळी आरक्षणाच्या बदलामुळे कुठल्या प्रभागातून उभे राहू या विवंचनेने गोधळलेल्या आजी, माजी नगरसेवक आणि नवीन इच्छूक उमेदवारांची चांगलीच भंबेरी उडणार आहे.
एनसीसीचे सर्वेसर्वा ऑनररी मेजर जी.एम. चोथे सर यांच्या अध्यक्षतेखाली एनसीसी सोल्जर फ्रंटच्या सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. एनसीसीचे माजी अंडरऑफिसर आणि 'एमबीपी न्यूज 24'चे मुख्य संपादक ऍड. उमेश अनपट यांनी शेवंगावकरांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मनात असलेली विकासाची "ब्ल्यू प्रिंट" सत्यात आणण्यासाठी प्रत्यक्ष निवडणुकीत उतरण्याचा आणि आपला स्वतंत्र पॅनल उभारण्याची संकल्पना नुकतीच मांडली. त्याचे सर्व एनसीसी सोल्जर फ्रंटने स्वागत करून हा विचार पुढे नेण्यासाठी बैठक घेण्याचे ठरले होते.
प्रत्यक्ष आणि ऑनलाईन झालेल्या बैठकीत चोथे सरांनी निवडणूक लढविण्याचा विचार मांडला. त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. मुबई पोलीस मध्ये कार्यरत माजी अंडर ऑफिसर गणेश देशमुख यांनी प्रस्तावना मांडली. त्यावर सखोल, साधकबाधक चर्चा करून सर्व शक्यता पडताळण्यात आल्या. या नंतर सर्वानुमते सर्व 21 प्रभागांमध्ये माजी एनसीसी कॅडेट्स राहिलेले आणि 'एनसीसी सोल्जर फ्रंट'चे सदस्य व त्यांचे कुटूंबीय प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरतील असा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
बैठकीस मारुती फरताळे, अतुल दहीवाळकर, प्रा. वसंत देशमुख, योगेश जाधव, रमेश जाधव, प्रा. अरुण चोथे, ऍड. उमेश अनपट, किरण कानडे, प्रमोद झिरपे हे प्रत्यक्ष तर गणेश देशमुख, ऍड. संदीप आंधळे, सहायक पोलिस निरीक्षक अनमोल केदार, प्रा. भारत धनवडे, ऍड. उद्धव चेमटे, बाळासाहेब बैरागी, नितीन भुसे, विशाल भारस्कर, आनंद जगदाळे, अभय पालवे आदी उपस्थित होते.
मिशन 21...
शेवगाव शहरातील सर्व 21 वॉर्ड मध्ये उमेदवार उभे करण्यासाठीची चाचपणी सुरू आहे. सर्व ठिकाणी असलेल्या आरक्षणानुसार उमेदवार रिंगणात उतरवले जाणार आहेत. हे सर्व उमेदवार उभे करून निवडून आणण्यासाठी "मिशन 21" हाती घेण्यात आले आहे.
एनसीसी सोल्जर फ्रंटची ताकद...
शेवगाव शहरातील न्यू आर्ट कॉमर्स ऍण्ड सायन्स कॉलेज मधील एनसीसी युनिट मधील मागील 25 वर्षातील हजारो आजी-माजी एनसीसी कडेट्स एनसीसी सोल्जर फ्रंट चे सदस्य आहेत. हे हजारो कडेट्स विविध क्षेत्रात सक्षमपणे कामगिरी बजावत आपल्या शेवगावाचे नाव दाही दिशेस झळकावीत आहेत. ही एक मुठ्ठी ताकद एनसीसी सोल्जर फ्रंटची आन, बाण, शान आहे.
असे असतील उमेदवार ...
👉🏻 एकता आणि अनुशासित
👉🏻 स्वच्छ चारित्र्य
👉🏻 उच्च शिक्षित
👉🏻 देशप्रेमाने ओतप्रोत भरलेले
👉🏻 गहिरे सामाजिक भान
👉🏻 नसानसात भिनलेली समाजसेवा
👉🏻 कायदा, प्रशासन, समाज यांची इथंभूत माहिती
👉🏻 विविध प्रश्न हाताळण्याचे कसब
विकासाची ब्ल्यू प्रिंट
'माझं शेवगाव म्हणजेच माझं घर' मानून त्याच सौंदर्य, महाकायता, सुरक्षितता, सोयी सुविधा आदी कशी असावी हे समोर ठेऊन शेवंगावच्या "विकासाची ब्ल्यू प्रिंट" एनसीसी सोल्जर फ्रंट चे कायदा, प्रशासन, अभियंता क्षेत्रावर मांड असणारे सदस्य तयार करत आहेत. प्रत्येक शेवंगावकरास (लहान मुले, विद्यार्थी, तरुण, प्रौढ, ज्येष्ठ नागरिक) आरोग्यदायी, सुसह्य, भयमुक्त, हायटेक जीवन जगता येईल, हा विचार समोर ठेऊन ही ब्ल्यू प्रिंट सत्यात उतरवण्यासाठी घडवली जात आहे.
'एनसीसी सोल्जर फ्रंट'ने सर्व सदस्य हे याच मातीतील असल्याने शेवंगावचे कर्ज प्रत्येकावर आहे. सध्या विविध क्षेत्रात उतुंग कामगिरी करत शेवंगावच्या नावाची पताका दाही दिशांना फडकविण्याचे काम या मातृभूमीरूपी आईची मुले करीत आहेत. न्यायव्यवस्था, पत्रकारिता, राजकारण आणि प्रशासन या चारही स्तंभात दुसऱ्या तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात, देशात आपली जबाबदारी पार पाडताना एनसीसीने दिलेले समाजसेवेचे व्रत जोपासत आहेत.
आता आपल्या मातीचे शेवंगावचे ऋण फेडण्यासाठी प्रत्यक्ष निवडणुकीत उतरण्यासाठी सज्ज आहेत. शेवंगावकरांचे प्रेमरूपी आशीर्वाद, विश्वास, पाठींबा, एक-एक मत एनसीसी सोल्जर फ्रंट चा आत्मविश्वास द्विगुणित करेल. तसेच शेवंगावच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट सत्यात उतरवण्यासाठी हेच मोठे पाठबळ ठरेल.