म्हणून 'या' बँकेने ३३ लाखांचे कर्ज माफ केले

अहमदनगर - देशभरातील बँका मेलेल्या माणसाचे कर्ज वसूल करीत असताना शिक्षक बँक आपल्या मृत्यु पावलेल्या सभासदाचे 33 लाख रुपयांचे कर्ज माफ करते. शिवाय १५ लाख रुपये त्याला मदत म्हणून देते. अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे हे कार्य कौतुकास्पद आहे.


राज्यभरातील इतर आर्थिक संस्थांनी याचे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. साळवे कुटुंबाला उघड्यावर पडून देणार नाही, तर त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी आपण सर्वजण ठामपणे उभे राहू, असे प्रतिपादन 'शिक्षक भारती'चे संस्थापक आमदार कपिल पाटील यांनी केले.

पारनेर तालुक्यातील शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रतन साळवे यांच्या कुटुंबियांना शिक्षक भारती परिवार व अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक यांच्यातर्फे आर्थिक मदत देण्यासाठी आयोजित केलेल्या शोकसभेत आमदार पाटील बोलत होते. आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक, पत्रकार चाँद शेख यांनी प्रस्तावना मांडली. 

यावेळी गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे, शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, उपाध्यक्ष दिनेश खोसे, जिल्हाध्यक्ष मुकेश गडदे, सरचिटणीस सुनील मते, महिला अध्यक्ष उषाताई येणारे, शिक्षक बॅंकेचे चेअरमन राजू राहणे, व्हाईस चेअरमन उषाताई बनकर, बँक शताब्दी समितीचे अध्यक्ष सलीमखान पठाण, माजी चेअरमन संतोष दुसुंगे, साहेबराव अनाप, शरद सुद्रिक, राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट, माध्यमिक सोसायटीचे नेते भाउसाहेब कचरे आदी मान्यवर व शिक्षक भारतीचे जिल्हाभरातील कार्यकर्ते उपस्थित होते .

पाटील म्हणाले की, साळवे यांच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्का बसला. शिक्षक भारतीच्या सर्व आंदोलनांमध्ये ते सक्रिय होते. त्यांच्या पत्नी व मुलांना सर्व मित्र परिवाराने मोठा आधार दिला. त्यांनी काळजी करू नये. आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत. तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. 

साळवे यांच्या जाण्याने शिक्षक भारतीच्या चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. शिक्षक बँकेने एवढी मोठी मदत केली. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी सुद्धा त्यांना मदत केली. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. 

एकीकडे बँका मेल्यानंतर सुद्धा कर्ज वसूल करतात. परंतु नगर मधली  शिक्षकांची पहिली बँक आहे कि जी आपल्या सभासदांना १५ लाख रुपये मदत म्हणून देते. म्हणून मी येथे आल्यानंतर पहिले बँकेचे संचालक मंडळाची भेट घेऊन त्यांना धन्यवाद दिले. 

साळवे परिवाराला मदत करण्यासाठी पत्रकार चांदभाई शेख या त्यांच्या वर्गमित्राने मोठी धडपड केली. त्यांनाही मनापासून धन्यवाद. अनुकंपा नोकरीसाठी साळवे कुटुंबीयांना मी व आमदार सुधीर तांबे हे सर्व प्रकारचे सहकार्य करू.

सन 2005 नंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांना पेन्शन लागू करण्यासाठी मोठा लढा द्यावा लागणार आहे. कारण केंद्र सरकारने आपली पेन्शन जागतिक बँकेकडे गहाण टाकली आहे. ती सोडवणे सोपे नाही. तरीसुद्धा आपला हा लढा चालू राहील. 

विनाअनुदानित, अनुदानित शिक्षकांना पेन्शन लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला त्यासाठी शिक्षक भरतीने फार मोठा सत्याग्रह केलेला आहे. लढाई अजून पूर्णपणे संपलेली नाही. त्यासाठी सुद्धा आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.

यावेळी शिक्षक बँकेतर्फे कुटुंब आधार निधी व सभासद कल्याण निधी मिळून 15 लाख रुपयांचा चेक तसेच शिक्षक भारती व साळवे यांच्या केंद्रातील शाळेतील शिक्षकांनी जमा केलेले केलेल्या रक्कमेचा चेक श्रीमती मंदा साळवे व त्यांची मुले यांना आमदार कपिल पाटील हस्ते प्रदान करण्यात आला .

प्रास्ताविक दिनेश खोसे यांनी केले. यावेळी बापूसाहेब तांबे, नवनाथ गेंड, राजू रहाणे यांनी आपले मनोगत व्यक्त शोकसभा असल्यामुळे सत्काराला पूर्णपणे फाटा देण्यात आला.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !