'या' कारणामुळे उद्धव काळापहाड यांनी दिला राजीनामा

अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील धारवाडी येथील तरुण उपसरपंच उद्धव अशोक काळापहाड यांनी सरपंच बापू गोरे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. इतर सदस्यांना संधी मिळावी यासाठी काळापहाड यांनी हा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. 


सुमारे अडीच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी सर्वांच्या सहकार्याने बंधारे, नदी खोलीकरण, घरोघरी शौचालये, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देणे, गॅसचे वाटप, कोरोना काळात अत्यावश्यक वस्तूंचे वाटप, वैयक्तिक खर्चातून प्राथमिक शाळेला मदत तसेच गोरगरीब कुटुंबांना  किराणा किटचे वाटप केले. 

इथून पुढच्या काळातही गावासाठी भरीव योगदान देऊ, ग्रामपंचायतला सहकार्य करू असं सांगितले. माजी सरपंच भीमराज सोनावणे, कैलास गीते, बबन गीते, किरण काळापहाड यांच्या सहकार्याने निवडणूक लढवून गावच्या राजकारणात प्रवेश केला. काळापहाड यांचे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही योगदान आहे. 

जिल्ह्यातील प्रसिद्ध निवेदक काळापहाड यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करून आभार मानण्यात आले. सरपंच बापूसाहेब गोरे,ग्रामसेविका श्रीमती कंठाळे, सदस्य विद्या गीते, संतोष डफळ, चरणदास आव्हाड,लता पालवे,संगीता आव्हाड यावेळी उपस्थित होते.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !