पुणे - आज 1 डिसेंबर रोजी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ अशी आहे. कोविड 19 (कोरोना)च्या पार्श्वभूमीवर होणारी ही राज्यातील पहिलीच निवडणूक असल्याने प्रशासनाने खूपच काळजी घेऊन नियोजन केले आहे.
‘कोविडपासून सुरक्षित निवडणूक’ हे ध्येय्य गाठताना मतदार आणि निवडणुकीसाठी कार्यरत यंत्रणा यांच्या आरोग्याची आवश्यक ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी पुणे विभागाचा आढावा घेऊन करण्यात आलेल्या पूर्वतयारीबाबत समाधान व्यक्त केले.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीला सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी यांच्यासह विभागीय आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड, पुणे, कोल्हापूर, सांगली, साताऱ्याचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनुक्रमे डॉ. राजेश देशमुख, डॉ. दौलत देसाई, डॉ. अभिजित चौधरी, शेखर सिंग, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पुण्याचे सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, उपायुक्त तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण, सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव उपस्थित होते.
पुणे पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेच्या एका जागेसाठी 62 उमेदवार तर शिक्षक मतदारसंघाच्या एका जागेसाठी 35 उमेदवार उभे आहेत. पुणे विभागात पदवीधर मतदारसंघात एकूण मतदार 4 लक्ष 26 हजार 257 तर शिक्षक मतदार संघात 72 हजार 545 मतदार आहेत.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदारांची संख्या जिल्हानिहाय पुढीलप्रमाणे –पुणे – पुरुष 89 हजार 626, स्त्री 46 हजार 958, इतर 27 (एकूण 1 लक्ष 36 हजार 611), सातारा जिल्हा – पुरुष
39 हजार 397, स्त्री 19 हजार 673, इतर 1 (एकूण 59 हजार 71 ), सांगली – पुरुष 57 हजार 569, स्त्री 29 हजार 661, इतर 3 (एकूण 87 हजार 233), कोल्हापूर – पुरुष 62हजार 709 , स्त्री 26हजार 820, इतर 0 (एकूण 89 हजार 529) आणि सोलापूर जिल्हा – पुरुष 41हजार 70, स्त्री 11 हजार 742, इतर 1 (एकूण 53 हजार 813).