अहमदनगर - नगर ते औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव शिवारात एका मारुती सुझुकी स्विफ्ट कारच्या इंजिनने अचानक पेट घेतला. काही मिनिटांतच ही कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
दरम्यान, ही पेटती कार रस्त्यातच उभी असल्यामुळं या महामार्गावरून ये जा करणाऱ्या इतर वाहनांच्या वाहतुकीमध्ये अडथळा आला होता. पण अखेरीस कारचे काहीच उरले नाही.
ही कार कोणाची होती, याचाही काहीच शोध लागलेला नव्हता. सोनई पोलिस याप्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत. या चौकशीनंतर संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे..
आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा