गुड न्यूज : 'ही' बँक महिला खेळाडूंना बनवणारआर्थिक साक्षर

महिला खेळाडूंच्या आर्थिक सबलीकरणाचा नवा पायंडा अनुकरणीय : रविंद्र नाईक

नाशिक : प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलमधील जिल्हा खो-खो असोसिएशनच्या प्रबोधिनीसाठी एका छोट्या आवर्त बँकेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी प्रबोधीनीच्या मुली आर्थिक साक्षरता व स्वावलंबनाचे धडे गिरवणार आहेत.


नाईक म्हणाले, नाशिक जिल्हा खो खो असोसिएशन खेळाडूंना केंद्र स्थानी ठेऊन कायमच नाविन्यपूर्ण व अनुकरणीय उपक्रम राबवत असतात. या प्रवासात पुढचे पाऊल टाकत देशातील पहिल्या आदिवासी मुलींसाठीच्या खो-खो प्रबोधिनीच्या खेळाडूंना आर्थिक साक्षर करण्यासाठी एका छोट्या बँकेची सुरुवात करून आणखी एका देशातील पहिल्या स्तुत्य उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. महानगरात राहणाऱ्या महिला सुद्धा बँकिंग बाबत जागरूक नसतात. अशा परिस्थितीत या छोट्या खेळाडूंना बँकिंग व अर्थ व्यवहार कळावा म्हणून राबविण्यात येनाऱ्या या अनोख्या उपक्रमाचे दूरगामी परिणाम भविष्यात पहायला मिळतील. यामुळे हे खेळाडू आर्थिक स्वावलंबन व बचतीच्या दिशेने चालायला सुरुवात करणार आहेत. देशातील सर्व क्रीडा संस्था व असोसिएशनने सुध्दा असा आधुनिक विचार करायला हवा.


सहकार खात्यातील अधिकारी अविनाश खैरनार यांनी बचतीचे महत्त्व खेळाडूंना लक्षात आणून दिले. या बँकेच्या माध्यमातून करणार असलेल्या बचती मुळे तुम्ही आर्थिक सक्षम होणार आहात. तेव्हा सर्व खेळाडूंनी याचे सभासद होणे गरजेचे असल्याचेही सांगितले.


कार्यक्रमाचे सूत्र संचलन व प्रास्तविक गीतांजली सावळे यांनी केले. तर प्रमुख अतिथी चे स्वागत नूतन संचालक कौसल्या पवार हिने केले. या प्रसंगी व्यासपीठावर खो खो असोसिएशन चे उपाध्यक्ष रविंद्र नाकील‌‌, सहसचिव दत्ता गुंजाळ, कांतीलाल महाले उपस्थित होते.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !