युवा आदर्श मल्टिपर्पज सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजन
नाशिक : शहरातील कथडा येथील युवा आदर्श मल्टिपर्पज सोशल फाउंडेशनच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक संस्थेचे अध्यक्ष व शिवसेनेचे विभाग प्रमुख मोईनोद्दीन शेख रफिक (बबलू) यांनी दिली आहे. रविवारी (ता. ३१) सकाळी ११ वाजता द्वारका येथील हॉटेल महाराष्ट्र दरबारच्या मागिल हरी नगरी येथे मुस्लिम समाजातील गरीब कुटूंबातील वधू-वरांचा हा विवाह सोहळा पार पडणार आहे.
अनेक वर्षांपासून राबवण्यात येणाऱ्या या स्तुत्य सामुदायिक विवाह सोहळ्यावेळी गरजूंना दोन हजार मास्क व दोन हजार सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी डोळ्यांचे तपासणी शिबीर घेऊन गरजूना चष्म्याचे वाटप व आवश्यक त्यांची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तसेच थेलोसिमिया रुग्णांच्या मदतीसाठी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
सय्यद मोईनोद्दीन जिलानी यांच्या आशीर्वादाने होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार तुकाराम गोडसे असणार आहेत. अल्पसंख्यानक आयोगाचे अद्यक्ष हाजी अराफत शेख, अन व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,पोलीस आयुक्त दीपक पांडे, महापौर सतीश कुलकर्णी, महाराष्ट्र हाज कमिटीचे अध्यक्ष हाजी इब्राहिम भाईजान, शिवसेना जिल्हा अध्यक्ष अप्पा करंजकर, आमदार सुहास कांदे, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, माजी मंत्री बबन घोलप, आमदार अब्दुल सत्तार, वसंत गीते, सुनील बागुल, सचिन मराठे, परवेझ कोकणी, अजय बोरस्ते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संस्थेचे सदस्य आले रसूल सय्यद नाजीम अली, फजल शेख, आसिफ पठाण, हमीद शेख, हमीद लालू, मुश्ताक शेख, अब्दुल रज्जाक, साजिद शेख, रमजान भाई, इरफान शेख, मजीद पठाण, रज्जाक शेख, समीर खतीब, सुभान खान, एकबाल सययद , नवीद शेख, उस्मान खान, जिलानी मलबारी कार्यक्रम आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.