आता काळ्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवणार 'डिजिटल करन्सी'

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची माहिती

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) देशामध्ये आपली डिजिटल करन्सी आणण्याबाबत विचार करत आहे. हे चलनाचे एक डिजिटल स्वरुप असते ज्याला रोखीमध्ये रुपांतरित किंवा एक्सचेंज केले जाऊ शकते. अनेक व्यवहारांमध्ये यामुळे बदल पाहायला मिळू शकतो. काळ्या पैशांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील हि करन्सी मदतीची ठरेल.

या बाबत माहिती देताना आरबीआयने म्हटले आहे, की वेगाने बदलणारा पेमेंट्स उद्योग, खासगी डिजिटल टोकनची आवक आणि कागदी नोट किंवा नाण्यांच्या व्यवस्थापनाशी संबंधित वाढीव खर्चाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक केंद्रीय बँका डिजिटल चलन (CBDC) आणण्याचा विचार करीत आहेत.

केंद्रीय बँकेच्या डिजिटल चलनाबाबतच्या शक्यतांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यासाठी आरबीआयने एक आंतर विभागीय समितीही स्थापन केली आहे. अशाप्रकारचे चलन व्यापक अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे आहे आणि आपण ते स्विकारायला हवे. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेच्या फायद्यासाठी अशा चलनाला प्रोत्साहन देखील दिले पाहिजे.

काय आहे CBDC ?

CBDC एक कायदेशीर चलन आहे, आणि डिजिटल स्वरूपात सेंट्रल बँकेची देयता आहे जी सार्वभौम चलनात उपलब्ध आहे. बँकेच्या बॅलन्सशीटमध्ये ही करन्सी आहे. ही करन्सी एकप्रकारे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असेल, जी आरबीआयद्वारे रोखीमध्ये रुपांतरित किंवा एक्सचेंज केली जाऊ शकते.

हा होणार फायदा ?

भारतीय चलनात डिजिटल करन्सी आल्याने पैशांच्या व्यवहारांबरोबरच इतर व्यवहारांच्या पद्धती बदलतील.  काळ्या पैशाला आळा बसेल, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चलनविषय धोरणाचे अनुसरण या डिजिटल करन्सीमुळे अधिक सोपे होईल. यामध्ये डिजिटल लेसर तंत्रज्ञान (डीएलटी) वापरायला हवे. डीएलटीद्वारे परदेशातील व्यवहारांबाबत सहज माहिती मिळेल.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !