गुड न्युज ! जगप्रसिद्ध नासा स्पेस ऍप चॅलेंज आता अहिल्यानगरमध्ये


अहिल्यानगर - शहरातील आयएमएस कॉलेजमध्ये दोन दिवस 'नासा स्पेस ऍप चॅलेंज' (NASA SPACE APP CHALLANGE) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक हेमंत केदारे आणि सुकन्या फणसळकर यांनी दिली आहे.

'नासा स्पेस ऍप चॅलेंज' हा जगभरातील सर्वात मोठा हॅकाथॉन असून नवनवीन तंत्रज्ञान, विज्ञान आणि नवकल्पना यामध्ये रस असलेल्या लोकांसाठी एक अनोखा मंच आहे.

या उपक्रमात विद्यार्थी, संशोधक, अभियंते, डिझायनर्स आणि उद्योजक एकत्र येऊन अवकाश, पृथ्वी, हवामान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित खऱ्या समस्यांवर उपाय शोधतात.

ही स्पर्धा केवळ तांत्रिक कौशल्यासाठी नसून सर्जनशीलता, टीमवर्क आणि समस्यांवर परिणामकारक तोडगे शोधण्याच्या दृष्टीनेही एक प्रेरणादायी अनुभव देते.

जगभरातील विविध शहरांमध्ये होणाऱ्या या हॅकाथॉनमध्ये सहभागी होऊन आपण नासाच्या डेटा आणि साधनांचा वापर करून नवनवीन कल्पना साकार करू शकता.

दोन दिवसांच्या हॅकाथॉनमध्ये विविध चॅलेंजेस दिल्या जातात. हा जागतिक हॅकाथॉन कोडिंग, डिझाइन, विज्ञान व नवप्रवर्तनात रस असणाऱ्यांसाठी आहे. नासाचा खुला डेटा वापरून पृथ्वी व अवकाशाशी संबंधित समस्यांवर सर्जनशील उपाय शोधण्याची ही संधी गमावू नका.

  • दिनांक : ४ आणि ५ ऑक्टोबर २०२५
  • स्थळ : आयएमएस कॉलेज, अहिल्यानगर
  • नोंदणीसाठी ऑनलाइन लिंक : Click Here
  • कॉल रजिस्ट्रेशन : ८४४६७ २३९६०
  • संघ आकार : १ ते ६ सदस्य
  • पात्रता : डिजिटल साक्षरता असलेले सर्वजण सहभागी होऊ शकतात.

या स्पर्धेचे आयोजक 'आर्यभट्ट इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्स अँड सायन्सेस', तर प्रायोजक 'तोडमल कॉमर्स अकॅडमी' आणि 'मनस्पर्श समुपदेशन केंद्र' हे आहेत.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि सर्जनशीलता यांचा संगम अनुभवण्यासाठी आजच नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !