बाणेश्वर महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

अहिल्यानगर - श्री बाणेश्वर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची १०९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने महाविद्यालयात वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. जाधव, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मुळे व आयक्यूएसी को-ऑर्डिनेटर प्रा. डॉ. शेख उपस्थित होते. मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. जाधव यांनी सांगितले की, देशाचे पुढील पन्नास वर्षांचे भवितव्य तरुणांच्या हाती असून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे अंत्योदयाचे क्रांतिकारक विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे.

दरम्यान, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त प्रेमराज सारडा महाविद्यालयात आयोजित तालुकास्तरीय निबंध, वकृत्व व पोस्टर सादरीकरण स्पर्धांमध्ये बाणेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना प्रा. प्रभुने पी. एस., प्रा. कडूस व प्रा. भस्मे एस. यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमास बाणेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक मा. आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब व संचालक युवा नेते माननीय अक्षय दादा कर्डिले यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारवंत नेत्यांच्या कार्य व विचारांची जाणीव निर्माण झाली.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !