लाच घेताना शिर्डीचे दोन पोलीस पकडले

अहमदनगर : शिर्डी पोलिस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांवर सोमवारी (दि.२५) लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली.  पोलीस नाईक बाळासाहेब यशवंत सातपुते (वय 38) व पोलीस हवालदार प्रसाद पांडुरंग साळवे (वय ४९) अशी आरोपींची नावे आहेत. 

पोलीस नाईक सातपुते यांनी हवालदार साळवे यांच्या सांगण्यावरून तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष 17 जानेवारी रोजी पाच हजार रुपयांची मागणी केली. तसेच पोलीस नाईक सातपुते याने काल सोमवारी लाचेच्या रकमेपैकी दोन हजार रुपयांची लाच शिर्डी पोलीस ठाण्यात पंच व साक्षीदारांच्या समक्ष स्वीकारीत असताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे शिर्डी पोलिसांमध्ये दहशत तसेच घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दहा दिवसांपूर्वीच लावला होता फलक

पोलीस ठाण्यातील कोणत्याही कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केल्यास थेट वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी संपर्क साधावा, अशा स्वरूपाचा फलक शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये दहा दिवसांपूर्वी लावण्यात आला होता.



Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !