मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करून वंदन केले. श्रीमती रश्मी ठाकरे यांनीही राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.
यावेळी ध्वजास सलामी देणाऱ्या पोलीस पथकासह उपस्थित वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राचा वारसा समृद्ध करणाऱ्या कामगिरीचा सन्मन
महाराष्ट्राला शैक्षणिक, सामाजिक आणि उद्योजकता यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यामध्ये भर घालणाऱ्या कामगिरीचा पद्म पुरस्काराने सन्मान झाल्याचे नमूद करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पद्म पुरस्कार जाहीर झालेल्या पुरस्कारांर्थींचे अभिनंदन केले आहे. देशातील अन्य पद्म पुरस्कारार्थीं मान्यवरांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.