मुंबईतील लोकल सेवे बाबत मुख्यमंत्र्यानी घेतला हा निर्णय

 मुंबई : कोरोना संकटापासून बंद असलेली मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी खुली करण्यासंदर्भातील  निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबत आढावा घेण्यात आला.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशा प्रकारे सुरु करता येईल यादृष्टीने विविध पर्यायांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जराड, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित होते.

तसेच आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !