TIK TOK चं दाना-पाणी संपलं, हे झाले परिणाम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - भारत आणि चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारत सरकारने टीकटॉकसह 59 चीनी ऍप्सवर बंदी घातली. त्यामुळे चीनला सर्वात जास्त मोठा फटका बसला आहे. चीनी कंपनी बाइटडान्सने भारतातील आपला व्यवसाय बंद करीत असल्याची घोषणा केली आहे. दोन हजार कर्मचाऱ्यांचा रोजगार गेला आहे.

टिकटॉकची ग्लोबल हेड वेनेसा पपास आणि ग्लोबल बिझनेस सोल्यूशन्सचे व्हॉइस प्रेसिडेंट ब्लॅक चेंडली यांनी ईमेलच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. कंपनीच्या निर्णयामुळे जवळपास 2 हजार कर्मचारी बेरोजगार होणार आहेत. गेल्या सात महिन्यांपासून आम्ही प्रयत्न करत आहोत. 

मात्र सरकारकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणून हा टोकाचा निर्णय घ्यावा लागत आहे. त्यामुळे भारतातील २ हजार कर्मचाऱ्यांना काढण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरला नाही. असे ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

कंपनीने कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांना पगार दिला असून कंपनीसोबत काम केल्यामुळे आणखी एका महिन्याचा पगार म्हणजे कंपनीने कर्मचाऱ्यांना चार महिन्यांचा पगार दिला आहे.

आम्ही नक्कीच पुन्हा भरारी घेऊन भारतात परत येऊ, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, पुन्हा कधी येऊ हे सांगता येत नाही.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !