नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील वाठोडा गावात घरगुती पाळीव कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मोठ्या प्रमाणावर गावठी कोंबड्या पाळल्या जाणाऱ्या वाठोडा गावात दोन दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याच्या सुमारे तीनशे कोंबड्या मेल्याने खळबळ उडाली होती. या मृत कोंबड्यांचा बर्ड फ्ल्यूचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने प्रशासन खबडून जागे झाले आहे. मृत कोंबड्या खड्डे करुन पुरण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले, कि वाठोडा गावाच्या चारही बाजूचा एक किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. सुदैवाने परिसरात कोणतेही व्यावसायिक पोल्ट्रीफार्म नसल्याने भीतीचे कारण नाही. पोल्ट्री संदर्भात योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देखील मांढरे यांनी सर्व पोल्ट्री धारकांना दिल्या आहेत.