वॉशिंग्टन : अमेरिकेचे नूतन अध्यक्ष जो. बायडन सरकारच्या प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रवास सल्ल्यात (ट्रॅव्हल अडवायझरी) भारतात जाऊ नका असे आपल्या नागरिकांना सांगितलं आहे. आताच्या परिस्थितीत नागरिकांनी भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश' मध्ये जाण्याचा प्रवास टाळला पाहिजे, असे सुचविले आहे.
अमेरिकेने प्रवासाच्या सल्ल्यात सांगितलं आहे की, कोरोना महामारी आणि दहशतवाद या दोन महत्वाच्या गोष्टींमुळे या देशांमध्ये प्रवास करताना पुर्नविचार करावा. तसेच सरकार इतर काही देशांमध्ये प्रवास करण्यावर बंदी आणण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार भारतात कोरोना व्हायरस च्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र अजूनही भारत लेवल ४ वर आहे. यामुळे भारतात प्रवास करने धोकादायक आहे.
भारत-पाकिस्तान सीमेवर जीवाला धोका आहे. यामुळे अमेरिकेतील नागरिकांना तेथे जावू नये. तसेच परराष्ट्र मंत्रालयाने नागरिकांना अफगाणिस्तानमध्येही प्रवास करण्यास बंदी केली आहे.