नवी दिल्ली : दिल्ली भेटीनंतर महाराष्ट्र कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या खांद्यावर मंत्रिपदाची जबाबदारी येणार असून दिल्लीकडून त्यांना 'ऊर्जा' मिळणार अशी चिन्हे आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानन्तर माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले प्रथमच दिल्लीला पक्षश्रेष्ठींच्या भेटीला जात आहेत. यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत त्यांच्या सोबत आहेत. राजधानी दिल्लीत झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मंत्रिपदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी सूचक प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे. त्यामुळे नाना पटोलेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नितीन राऊत यांच्याकडे असलेले ऊर्जा खाते नाना पटोलेंकडे जाण्याची चिन्हे आहेत.मात्र विद्यमान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे महत्त्व कमी न करता खातेबदल होण्याचे संकेत मिळत आहेत.