नाशिक - महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रणालीमध्ये प्रलंबित अनोंदणीकृत व नोंदणीकृत फेरफार यांची प्रलंबितता कमी करणेबाबत नाशिक विभागात उल्लेखनीय कामकाज झाले असून नाशिक विभागातील नंदुरबार, अहमदनगर, जळगांव, धुळे व नाशिक हे जिल्हे राज्यात अनुक्रमे एक ते पाच स्थानी आहेत. नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा राज्यात प्रथम स्थानावर तर अहमदनगर द्वितीय क्रमांकावर आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे.
ई-फेरफार प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन त्यांचे अधिनस्त अधिकारी कर्मचारी यांच्या कामकाजाचा आढावा नियमित घेण्यात आलेला आहे. नाशिक विभागातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी अथक मेहनत घेऊन राज्यात ई-फेरफार प्रणालीमधील प्रलंबित फेरफार यांची प्रलंबितता कमी करून विभागातील जनतेला दिलासा देणारे कामकाज केले आहे, असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.
महसूल विभागाच्या ई फेरफार प्रकल्पातील सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी सामान्य नागरिकाला सोप जावे म्हणून महाभूमी हे https://mahabhumi.gov.in संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून या संकेतस्थळाच्या आधारे कोणालाही महसूल विभागाच्या सर्व सशुल्क आणि निशुल्क सेवांचा लाभ घेता येणार आहे, अशी माहितीही विभागीय आयुक्त गमे यांनी दिली आहे.
जिल्हा आणि एकुण भरलेल्या नोंदी (टक्के)