मदतीचा हात ! बॉम्बे मशिनरीकडून शासकीय कोविड सेंटरला 50 हजार

शेवगाव - रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीच्या पुढाकाराने बॉम्बे मशिनरी शेवगावचे संचालक सुधीर शेठ सबलोक यांनी ग्रामीण  रुग्णालय शेवगावच्या कोविड सेंटरला साहित्य खरेदीसाठी 50 हजार रुपयाची मदत शेवगावचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. रामेश्वर काटे यांच्याकडे सुपुर्द केली.


साहित्य खरेदी

या मदतीमधून कोविड सेंटर साठी कॉम्प्युटर, फ्रीज, खुर्च्या, कपाट, इत्यादी साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. मदत मिळून देणेसाठी रोटरीचे प्रोजेक्ट चेअरमन डॉ. भागनाथ काटे यांनी विशेष पुढाकार घेतला.

यावेळी तहसीलदार अर्चना पागिरे मॅडम, रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी चे अध्यक्ष किसनराव माने, सेक्रेटरी बाळासाहेब चौधरी, खजिनदार डॉ. पुरुषोत्तम बिहाणी, प्रोजेक्ट चेअरमन तसेच रोटरीचे माजी अध्यक्ष भागनाथ काटे, माजी सहप्रांतपाल डॉ. संजय लढ्ढा, माजी अध्यक्ष डॉ. गणेश चेके तसेच रुग्णालयातील स्टाफ उपस्थित होता. कार्यक्रम कोरोनाचे सर्व शासकीय नियम पाळून घेण्यात आला.

सुत्रसंचलन डॉ भागनाथ काटे तर आभार सेक्रेटरी बाळासाहेब चौधरी यांनी मानले.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !