सावधान ! नगर जिल्ह्यात कोरोनामुळे झालेत तीन दिवसांत तब्बल ८४ मृत्यू

अहमदनगर - कोरोनाचे तांडव आणखी रौद्ररूप धारण करत आहे. जिल्ह्यात गेले तीन दिवसांत एकूण ८४ मृत्यू झाले आहेत. वेळेवर ऑक्सिजन बेड उपलब्ध न होऊ शकल्याने तसेच ऐन संकटकाळात औषधांचा काळाबाजार झाल्यामुळे हे संकट ओढवले आहे. 


बुधवारी सायंकाळपर्यंत चोवीस तासांच्या कालावधीत जिल्ह्याच्या रूग्ण संख्येत २ हजार ४०५ ने वाढ झाली आहे. रुग्ण वाढीचे आकडे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५ हजार ५१७ इतकी झाली आहे. 

जिल्ह्यात बुधवारी १ हजार १२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६ हजार २२१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण चांगले आहे. बुधवारी सायंकाळ पर्यंत हे प्रमाण आता ८६.२९ टक्के इतके आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५५६, खाजगी प्रयोगशाळेत तपासणीत ५१७ व अँटीजेन चाचणीत १,३५२ रुग्ण बाधीत आढळले. चाचणी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे या ठिकानीही कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !