अट्टल गुन्हेगार 'चेकमेट' : फसवणूक, चोरी, ब्लॅकमेलिंग, खंडणी, लफडेबाजी ते 'हद्दपारी'

अट्टल गुन्हेगार लांडग्याने 'जन'तेची लाखोंची फसवणूक करून 'मंगल' बरोबर मजा केली. नंतर चोरी, ब्लॅकमेलिंग, खंडणी उकळून दिवे पाजळले. एवढ्यावर न थांबता 'बाहेर'ची सोबत लफडेबाजी करून चांगलेच रंग उधळलेत. बायको, मुले, सासरा, कुटूंबीय, भावकी, नातेवाईक, मित्र, सहकारी, गावातील लोक अशा प्रत्येकाची घोर फसवणूक या भामट्याने केली आहे. अशा शेकडो लोकांना गंडा घालून तब्बल 114 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणारा हा अट्टल गुन्हेगार लांडगा आता 'तोतयागिरी' करत गावात खंडणी उकळत मोकाट फिरतो आहे. त्यामुळे वेठीस धरून अख्खा गाव नासवणाऱ्या या पिसाळलेल्या जनावराच्या 'हद्दपारी'साठी अनेक पीडित, सामाजिक संघटना पुढे सरसावल्या आहेत.

फसवून सासऱ्याचा घेतला जीव
अनेकांना टोप्या घालणाऱ्या अट्टल गुन्हेगार लांडग्याने स्वतःच्या सासऱ्यालाही सोडले नाही. पतपेढी व गुंतवणूकदारांना गंडा घालून लाखोंचा घोटाळा केल्यावर हा भामटा चांगलाच अडचणीत सापडला होता. त्यावेळी 'दिवटा जावई' जेलमध्ये जाऊ नये म्हणून सासऱ्याने आपली सर्व जमीन पतपेढीत तारण ठेऊन कर्ज घेतले. मुलीच्या सुखासाठी ते कर्जाचे पैसे घेऊन पतपेढीचा घोटाळा मिटविला. त्यामुळे हा भामटा कायद्याच्या कचाट्यातून सुटला. मात्र, या भामट्याने संकटातून बाहेर काढणाऱ्या आपल्या सासऱ्यालाही टोपी घातली. या कर्जाचे पैसेच भरले नाहीत. उलट आणखी घोटाळे करत राहिला. पठानवाडीत पोलिस कोठडीत व नंतर काही महिने तुरुंगात गेला. दिवट्या जावयाला सुधारण्यासाठी आपले सर्वस्व गमावलेल्या सासऱ्याचा अखेर खचून मृत्यू झाला.
मारहाण करून 'तिचे' शोषण
अनेक गुन्हे करणारा हा लांडगा घरचीला अक्षम्य मारहाण करायचा. अगदी भररस्त्यावर मारहाण केल्याचेही प्रत्यक्षदर्शी सांगतात. एव्हढ्यावर न थांबता या लिंगपिसाट लांडग्याने घरचीला सोडून बाहेरच्या एका 'रेखी'व देहाच्या वीरांगनेशी लगड केली. तिला खोटे लग्नाचे आमिष दाखवून अनेक दिवस तिचे लैंगिक शोषण केले. मात्र, तिने लग्नाची मागणी केल्यावर तिला शिविगाळ, मारहाण करण्यास सुरुवात केली. हे नित्याचेच झाल्याने भामट्या पासून आपल्या जीवाला धोका होईल, म्हणून तिने एक दिवस थेट ठाणे गाठले. तेथे शिवीगाळ, मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला. तिथे हा तिच्या पाया पडला. यानंतरही तिचे 'शोषण' सुरूच होते. शेवटी आपली फसवणूक झाल्याने तिने लग्नाचे आमिष दाखवून लांडग्याने आपले लैंगिक शोषण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. मात्र आधीच गुन्हेगारी प्रतापामुळे जेलवारी केलेल्या लांडग्याने तिच्यापुढे लोटांगण घातले, पाया पडला, रडला, लाळघोटेपणा करून आपल्यावरील कायदेशीर कारवाई कशीबशी लांबवली. सध्या तिच्या घरी आठवड्याचा बाजार भरून मनधरणी करतोय. तिथेच पडून असतो. तिच्या कमाईवर जगतोय. तिचे शोषणही करत आहे.
114 गंभीर गुन्हे दाखल
पतपेढीतील अनेकदा गफला केल्याने 420, 138 चे अनेक गुन्हे भामट्या लांडग्याविरुद्ध दाखल आहेत. तसेच पठानवाडीत केलेल्या फसवणूक प्रकरणीही गुन्हा दाखल आहे. याशिवाय व्यावसायिकांकडून भरणा म्हणून घेतलेले पैसे पेढीत न भरल्याने त्याच्या परताव्यासाठी हमी म्हणून चेक दिले होते. मात्र, पैसे न दिल्याने या भामट्यावर गुन्हे दाखल आहेत. तसेच घरगुती हिंसाचार व बलात्कारासारखा गंभीर गुन्हा देखील दाखल आहे. यात कधीही लांडग्याला पुन्हा डांबू शकतात. अशा प्रकारचे तब्बल 114 गुन्हे या भामट्याविरुद्ध अनेक ठिकाणी दाखल आहेत.
तोतयागिरी, ब्लॅकमेलिंग, खंडणीच्या गुन्ह्यांची भर
लोकांचे चेक घेऊन त्यांच्या नावावर बँकेतून परस्पर पैसे काढण्याचे प्रताप लांडग्याने केलेले आहेत. यातून फसवणूक झालेली मंडळी लवकरच गुन्हे दाखल करणार आहेत. पत्रकार असल्याची बतावणी करून तोतयागिरी करत पैसे घेऊन प्रतिष्ठित लोकांची बदनामी केल्याप्रकरणी अनेकजण गुन्हे दाखल करणार आहेत. अशा 'सुपारी' देणारांवर देखील कायदेशीर कारवाई होणार आहे. तसेच लोकांची बदनामी करणे, धमकावणे, ब्लॅकमेलिंग करणे, खंडणी उकळणे आदी गुन्हेगारी कृत्यांबाबतही लवकरच गुन्हे दाखल होणार आहेत. याबाबतचे सर्व कॉलरेकॉर्डिंग, व्हिडिओ आदी टेक्निकल पुरावे एकत्र जमविण्याचे काम अनेक पीडित लोक करत आहेत.
'हद्दपारी'साठी उभारणार जनआंदोलन
गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असताना हा भामटा मोकाट फिरतो कसा, असा प्रश्न पीडित व पंचक्रोशीतील लोक विचारत आहेत. तसेच समाजाला घटक अशा या गुन्ह्याची पुनरावृत्ती हा 'महाठक' नेहमीच करत आहे. याशिवाय छोटे-मोठे व्यावसायिक, ठाण्यातील अधिकारी व शिपाई, विविध प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्यक्ष, फोनवरून धमकावून खंडणी उकळण्याचे काम हा तोतया करत आहे. 'चोराच्या उलट्या बोंबा' म्हणावे तसे हा अट्टल गुन्हेगार समाजातील प्रतिष्ठित लोकांविरुद्ध बोगस तक्रारी देऊन त्यांना वेठीस धरत आहे. त्याच्या या गंभीर कृत्यांमुळे सर्वत्र  दहशत पसरली असून भीतीचे सावट पसरले आहे. एकूणच समाजासाठी 'घातक' बनलेल्या या गंभीर गुन्हेगारास गावातून हद्दपार करून गावाची शांती अबाधित ठेवण्यासाठी पंचक्रोशीतील लोक एकवटले आहेत. अनेक सामाजिक संघटना या भामट्याची हद्दपारी करण्यासाठी लढा उभारणार असून आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांच्यापासून थेट गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार आहेत.
जनहित याचिकेची तयारी
यासह या भामट्याविरुद्ध आधीच दाखल अनेक गुन्ह्याची माहिती एकत्र केली असून इतर दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची सर्व कागदपत्रे एकत्र करून जनहित याचिका देखील दाखल करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ यांची मदत घेतली जाणार आहे. या भामट्याची हद्दपारी झाल्याशिवाय आता थांबायचे नाही, असा निर्धार लोकांनी केला आहे.
प्रेस कॉन्फरन्सद्वारे पर्दाफाश
गुन्हेगार लांडग्याच्या विरोधातील सर्व दाखल गुन्हे, त्यांची कागदपत्रे, तोतयागिरी, धमक्या, खंडणीचे गुन्हे यांचे सर्व कागदपत्रे, पुरावे एकत्र करून लवकरच जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येणार आहे. त्यावेळी सर्व प्रसारमाध्यमांना पाचारण करण्यात येणार आहे. यावेळी या भामट्या तोतयाने गाव कसा वेठीस धरलाय याचे सर्व कागदपत्रे, रेकॉर्डिंग, व्हिडिओ आदी पुरावे देऊन या अट्टल गुन्हेगाराचा पर्दाफाश केला जाईल.

क्रमशः

आजच्या गोष्टीची शिकवण : 

1. बुरे कामो का नतिजा हमेशा बुरा होता है 

2. समाजविघातक कृत्ये केल्यावर लोक गावाबाहेर फेकतात

3. तोतया, अट्टल गुन्हेगारांना ओळखायला शिकले पाहिजे

4. आपली औकाद पाहून पाय पसरायला हवेत

5. जो कुटुंबाचा झाला नाही तो दुसऱ्याचा काय होणार

6. कायद्या पेक्षा कोणीही मोठे नाही

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !