शेवगाव : 'अँटिकरप्शन फाउंडेशन दिल्ली' या संस्थेच्या पैठण तालुका अध्यक्षपदी महेश सुनील राजेभोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संतोष दारकुंडे यांच्या उपस्थितीत व उपविभागीय पोलीस अधिकारी डीवायएसपी सुदर्शन मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली राजेभोसले यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
यावेळी सुनील पहिलवान यांची मीडिया निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी संस्थेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, अमोल ढाकणे, सचिन साळवे, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
अँटिकरप्शन फाउंडेशन दिल्ली यांच्या वतीने 1 जून रोजी अहमदनगर जिल्ह्यात विविध पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. डीवायएसपी मुंढे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.