'अहमदनगर अग्नीकांड' ! त्या चौघांना 'इतके' दिवसांची पोलिस कोठडी

अहमदनगर - जिल्हा शासकीय रूग्णालयातील (Civil Hospital) अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगी प्रकरणी (Intensive Care Unit Fire Case) मंगळवारी अटक (Arrested) केलेल्या चार जणांना दोन दिवस पोलीस कोठडीत (Police Cell) ठेवण्याचा आदेश न्यायालयाने (Court Order) दिला आहे. 

या आरोपींमध्ये एक वैद्यकीय अधिकारी (Medical officer) व तीन परिचारिकांचा (Nurse) समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे (Medical Officer Visakha Shinde), परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक (Arrested) केलेली आहे. 

तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके (Deputy Superintendent of Police Sandeep Mitke) यांनी या चार जणांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत (Police Cell) ठेवण्याचा आदेश केला आहे. दरम्यान या प्रकरणी आणखी नावे समोर आलेली नाहीत. 

सध्या चारच आरोपी पोलिस तपासात निष्पन्न झाले आहेत. आणखी काही नावे निष्पन्न झाली, तर आरोपींची संख्या वाढू शकते. निष्कारण कोणालाही गुन्ह्यात गोवले जाणार नाही. तसेच कोणाची गयही केली जाणार नाही, असे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !