बापरे ! महाराष्ट्रात तब्बल 'इतक्या' कोटी लाेकांचे लसीकरण

मुंबई - महाराष्ट्रात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाने नुकताच दहा कोटींचा टप्पा पार केला आहे. बुधवारी दुपारी ४ वाजता राज्यात १० कोटी लसींच्या मात्रा देण्याचा टप्पा गाठण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे, अशीमाहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

टोपे यांनी सांगितले की, राज्यात लसीची पहिली मात्रा ६,८०,५३,०७७ तर दुसरी मात्रा ३,२०,७४,५०४ दिल्या आहेत. एकूण १०,०१,२७,५८१ लस देण्यात आल्या आहेत. या यशात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व स्तरावरील अधिकारी-कर्मचारी यांच्याबरोबरच लसीकरण मोहिमेत योगदान देणाऱ्या प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे.

टोपे म्हणाले की, लसीकरणाच्या मोहिमेस गती देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्राधान्य दिले आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी, मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले. त्यामुळेच हा टप्पा पार करता आला. राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून लसीकरण केले जाणार आहे. 

त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकाला ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत लशीच्या दोन्ही मात्रा देण्याचे उद्दिष्ट आहे. १६ जानेवारीला राज्यातील लसीकरणाच्या मोहिमेस सुरुवात झाली होती. प्रथम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाची मोहिम राबविण्यात आली. 

नंतर खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात येऊ लागले. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मिशन कवच कुंडल, मिशन युवा स्वास्थ्य अशी अभियान राबविण्यात आले. अजूनही अनेक नागरिकांचे लसीकरण होणे बाकी आहे, त्यांनी लवकरात लवकर लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !