नवी दिल्ली - तालिबानचा नेमका प्रमुख कोण, हा प्रश्न सर्वाना पडलेला असताना आता एक नवा लीडर समोर आला आहे. आपण अजून जिवंत आहोत, असे सांगत त्याने स्वतःच ही माहिती दिली आहे.
हैबतुल्लाह अखुंदजादा असे या नव्या लीडरचे नाव आहे. नुकतेच दक्षिण अफगाणिस्तानातील कंदहार शहरात अखुंदजादाने समर्थकांना संबोधित केले. त्यावेळी त्याने ही माहिती दिली.
अखुंदजादा हा सन २०१६ पासून येथील इस्लामी कारवायांत नेतृत्व करत आलेला आहे. मात्र गेल्या काही काळापासून तो भूमिगत होऊन बसला होता. ऑगस्टमध्ये देखील तालिबानने अफगाणिस्तानवर केलेल्या वर्चस्वानंतरही तो समोर आलेला नव्हता.
त्यामुळे त्याच्या मृत्यूची अफवा देखील समोर आली होती. अखुंदजादा दारुल उलूम हकिमा मदरशात आपल्या लढवय्यांशी चर्चा करण्यासाठी दाखल झाला. त्याचे छायाचित्र मात्र समोर येऊ शकले नाही. त्यामुळे त्याच्या भूमिकेबद्दल अनेकांना अजूनही संभ्रम आहे.