MBP Live24 - कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या वाढत्या संख्येमुळे बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता वाढत आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकूण ३ लाख ४९ हजार ४७ रुग्ण बरे झाले असून जिल्ह्यातील हे प्रमाण आता ९७.८३ टक्के इतके झाले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५१ आणि अँटीजेन चाचणीत २० रुग्ण बाधित आढळले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून रुग्णामध्ये मनपा ३, कर्जत ४, राहुरी ४ आणि श्रीगोंदा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, अकोले १, जामखेड १, कर्जत ४, नगर ग्रामीण ४, नेवासा २, पारनेर २, राहता १६, राहुरी १, संगमनेर २ आणि श्रीगोंदा ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
तर अँटीजेन चाचणीत २० जण बाधित आढळून आले आहेत. कर्जत २, नगर ग्रामीण १, नेवासा १, पारनेर ३, राहाता १, राहुरी ३, संगमनेर ४, शेवगाव १, श्रीगोंदा २ आणि इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे.