बाकी सब मोह माया है..!

'अपेक्षा' नक्की ठेवाव्यात माणसानं, पण त्यांना कधी पूर्ण होण्याची इच्छा पाळू नये ! अपेक्षा स्वतःकडून, कुटुंबाकडून (Family), आप्तेष्ठांकडून, जीवलगांकडून (Relatives), तसंच आपल्या कर्माकडूनही ठेवाव्यात. पण.. 


जर अपेक्षा (Expectations) पाळल्या, तर मनुष्याचं जगणं कठीण होऊन बसतं !!! कारण 'अपेक्षा' हा ब्रम्हराक्षस असतो. त्याची भुक, भुक असते. जी कधीच शमत नाही. मनुष्यानं समाधानी रहावं. 

जेथे स्वर्गाचा सहवास लाभतो. तुम्ही काय करता, काय देता किंवा समजता याला काहीच अर्थ नसतो. तुम्ही काय आहात, कसं वागता, कसं समजून घेता अन् कुठपर्यंत चालता, याला जास्त महत्व असतं. 

जसं 'मी' पासून सुरू होणारी घटना 'तू' पर्यंत संपते, तिथे मनोरंजन सुरू होतं. कोण श्रेष्ठ ? पण 'मी'पणाला अहंकाराच्या शिडीवर चढवून स्वतःचं अस्तित्व धोक्यात आणू नये. 

नम्रतापूर्वक स्वतःची अपेक्षा स्वतःच पूर्ण करण्याचा प्रयत्न असावा. कोणाला दोष देऊन स्वतःचं महत्व पटवून नसतं द्यायचं कधी. त्यात आपल्या जिभेवर काटे उगवतात. मग तेच काटे नंतर बोचायला लागतात नकळत ! 

आपल्याला माहीत असतं दुनिया (World) कशी आहे. यापेक्षा कोणती ती हुशारी महान, तरीही आपण चुकतो, मग आपण माणूस आहोत. महापुरुष नाही ! म्हणून आपण समाधानी राहून सुखाचा उपभोग घेऊ ! 

हा शब्दप्रपंच या साठीच आहे की आपण समाधानी असावं.. बाकी 'सब मोह माया है' !

- नितीन कलावती आसाराम ढाकणे (अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !