बापरे ! तब्बल ४ कोटींचे हेरॉइन जप्त, NCB ची सर्वात मोठी कारवाई..

मुंंबई - एनसीबीने मुंबई विमानतळाजवळ कार्गो कॉम्प्लेक्स येथून ४ कोटी किमतीचे हेरॉइन जप्त केले आहे. तसेच याप्रकरणी गुजरातमधील व्यक्तीची चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

एकीकडे क्रुझ ड्रग्ज पार्टी गाजलेली असताना आता एनसीबीने ही कारवाई केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनल युनिटने ही कामगिरी केली. सहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका पार्सलद्वारे हे हेरॉईन येणार असल्याची गोपनीय माहिती नार्कोटिक्स ब्युरोला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई झाली.

छापा टाकून पार्सलची तपासणी करण्यात आली. त्यात कार्गो कॉम्प्लेक्समधील कॉन्फरन्स हॉलमध्ये एका पार्सलमध्ये सफेद पावडरचे पाकीट आढळले. ते हेरॉइन असल्याचे स्पष्ट झाले. त्याची अंदाजे किंमत ४ कोटी रुपये असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !