शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी आता तब्बल 'इतके' ऑफलाईन पासेस

अहमदनगर (शिर्डी) - कोरोना निर्बंधामुळे शिर्डी येथील श्री साईबाबा दर्शनासाठी यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने पासेस घ्यावे लागत होते. आता कोरोना निर्बंध शिथील होत असल्याने यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता साईबाबा यांच्या दर्शनासाठी ऑफलाईन पासेसची सोय करण्यात आली आहे. 

आता  दररोज १०  हजार ऑफलाईन प्रवेश पासेसचे वितरण करण्यात येणार आहे, असा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ५ ऑक्टोंबर २०२१ शिर्डी येथे बैठक घेण्यात आली होती. 

अहमदनगर येथील कोरोना वाढती रूग्णसंख्या पाहता धार्मिक स्थळांवर व प्रार्थनास्थळांवर कोरोना नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार ६ ऑक्टोंबर २०२१ पासून श्री साईबाबा संस्थांमधील सर्व १५ हजार पासेस ऑनलाईन देण्याचा निर्णय जाहीर केला होता. 

मात्र आता अलीकडच्या काळात अहमदनगरमधील कोरोना रूग्णसंख्या कमी होत असल्यामुळे शिर्डी येथील श्री.साईबाबा संस्थान कडून ऑफलाईन पासेस वितरणाची परवानगी देण्यात यावी. असा प्रस्ताव जिल्हा आपत्ती व्यवस्थापनास पाठवण्यात आला होता. 

या प्रस्तावावर झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी निर्णय घेतलाा. आता दररोज १० हजार ऑफलाईन पासेस वितरणाला परवानगी दिली आहे. मात्र कोविड नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. हा निर्णय जिल्हाधिकारी यांनी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळवला आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !