दिल्ली - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी गोरखपूर येथे साजरी झाली, यावेळी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी एक खळबळजनक विधान केले आहे.
उत्तर प्रदेशमधील गोरखपुर येथे जनतेला त्यांनी संबोधित केले. त्यावेळी त्यांनी इंदिरा गांधी यांच्या मृत्यूबद्दल त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले.
प्रियांका गांधी म्हणाल्या, 'माझी आजी इंदिरा गांधी यांना माहित होते की त्यांची हत्या केली जाणार आहे. त्यांनी मी आणि माझा भाऊ शाळेत जात असताना आम्हाला सांगितले होते, जर मला काही झाले तर रडायचे नाही.
मी आज तुमच्यासमोर उभी आहे तर ती इंदिरा गांधी यांचीच शिकवण आहे. मी देखील तुमचा विश्वास कधीही तोडणार नाही. असे म्हणत प्रियंका गांधी यांनी जनतेला संबोधित केले.
इंदिरा गांधी यांना माहिती होते की त्यांची हत्या होणार आहे. पण तरीही त्या कधीच मागे हटल्या नाही. त्यांच्यासाठी देश जास्त महत्त्वाचा होता. त्यांच्या हृदयात नेहमी देशाबद्दल आदर होता, असेही प्रियांका म्हणाल्या.
देशात सध्या अनेक वर्गांचे शोषण सुरु आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गुरू गोरखनाथ यांच्या शिकवणीच्या विरुद्ध चालत आहे. उत्तर प्रदेशातच नाही, तर रोजच जनतेवर हल्ले होण्याचे प्रकार समोर येत आहेत.
लखीमपूर येथे ज्या प्रकारे शेतकऱ्यांची हत्या झाली. त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले नाही. हे या सरकारची वास्तविकता आहे. असे म्हणत गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर देखील टीका केली.