मुंबई - शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला नार्कोटिक्स विभागाने अटक करून सव्वीस दिवस जेलमध्ये ठेवले. नुकतीच त्याची जामिनावर मुक्तता झाली आहे. परंतु, या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे भडकल्या आहेत. त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
आर्यन खान प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे यांना थेट केंद्राला सवाल विचारला आहे. त्या म्हणाल्या की, आर्यन खानकडे काहीच सापडले नाही. तर मग त्याला २६ दिवस कोठडीत का ठेवले? त्याच्यासोबत जे काही घडले एक आई म्हणून वाईट वाटते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची अखेर जामिनीवर सुटका झाली आहे. पण या प्रकरणावरुन गेले काही दिवसांपासून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. त्यात आता खासदार सुळे यांनीही आपली खंत व्यक्त केली आहे.
अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या मुलांचे पुन्हा समाजात पुनर्वसन होणे महत्त्वाचे आहे. त्यांना तुरुंगवास देणे हा उपाय नाही. हा खूप गंभीर विषय आहे. मात्र, काही अधिकारी अशी काही भाष्य करतात आणि कोणाच्याही मुलांवर अन्याय होत असेल तर हे महाराष्ट्र आणि देशासाठी हे योग्य नाही, असेही त्या म्हणाल्या.