मनोरंजन - वेब सिरीजमध्ये खूप दिवस पहिल्या स्थानावर असलेल्या मिर्झापूरची छाप अजूनही प्रेक्षकांच्या मनातून पुसलेली नाही. आजही विचारला जाणारा एक प्रश्न कायम आहे. तो म्हणजे “मिर्जापूर 2 कधी येत आहे?” आता मात्र या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार आहे. शुक्रवारी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने वेब सिरीज मिर्झापूरचा सिक्वल (भाग २) रिलीज करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
image source: indianexpress.com |
शुक्रवारी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात हे आश्वासन दिले आहे. व्हिडिओ वेब मालिकेच्या चाहत्यांसाठी ही एक चांगली ट्रिट आहे. मिर्झापूर २ च्या प्रदर्शनाची प्रत्येकजण उत्सुकतेने वाट पाहत आहे, हेच यातून दिसून येते.
गेल्या महिन्यात मिर्झापूर २ ची कास्ट एक डबिंग स्टुडिओमध्ये स्पॉट झाली होती. या वर्षाच्या सुरूवातीस वेब मालिका प्रवाहित होण्यास नियोजित होती. परंतु, कोरोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे पुढे ढकलली गेली आहे. आता मात्र ही सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल, हे स्पष्ट आहे.
मिर्झापूर - अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर यापूर्वी रिलीज झालेली मिर्झापूर सिरीज गुन्हेगारी, प्रेम, भावना, सस्पेंस आदींचे मिश्रण होती. यात अली फजलसह इतर कलाकारांनी दमदार अभिनय सादर केल्यामुळे प्रेक्षकांना ती अधिक भावली. यातून कोणत्याही प्रवृत्तीचे उदात्तीकरण करण्याचा हेतू नसल्याचे निर्मात्यांचे म्हणणे असले तरी या सिरीजचा जनसामान्यांवर माेठा प्रभाव पडलेला आहे.
दुनिया में दो तरह के फैन होत है..
एक सिर्फ फैन.
जो किसीके भी होते है..
और एक, जो सिर्फ 'मिर्झापूर' के होते है..!
या डायलॉगने सुरु होत असलेल्या ट्रेलरवरुनच प्रेक्षकांना कल्पना येते की लवकरच मिर्झापूरचा सिक्वल त्यांच्या भेटीसाठी येणार आहे. "मिर्झापूर एक नाम है, जुनून है.. जो आपके दिलो दिमाग में घुस जाता है" असे सांगत या सिरीजच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता ताणली आहे.