धक्कादायक ! 'हरवणे हत्याकांड' प्रकरणातील आराेपींची निर्दोष मुक्तता

शेवगाव (अहमदनगर) - येथील बहुचर्चित हरवणे हत्याकांड प्रकरणातील आरोपींची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. दि. १८ जून २०१७ रोजी विद्यानगर वसाहतीत एकाच कुटुंबातील चार जणांचा निर्घृणपणे खून करून दरोडा टाकला होता. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींची मुक्तता झाली आहे.


सराईत गुन्हेगार उमेश हरिसिंग भोसले, अल्ताफ छगन भोसले, अमोल संतोष पिंपळे, परसिंग हरिसिंग भोसले, व रमेश छगन भोसले (सर्व रा. नेवासा तालुका, जि. अहमदनगर) अशी न्यायालयाने निर्दोष घोषित केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरूद्ध दरोडा, खून करणे, आर्म अॅक्ट आदी कायद्यान्वये गुन्हा दाखल होता.

त्यांनी शेवगावच्या विद्यानगर कॉलनीत हरवणे कुटुंबियांच्या घरी दरोडा टाकून सोने व रोकड लंपास केली, असे दोषारोपपत्र पोलिसांनी दाखल केले होते. परंतु, प्रत्यक्ष खटला सुरू झाला त्यावेळी काही साक्षीदार फितूर झाले. तसेच पंचनामे व पुरावे सादर करताना सरकार पक्षाची दमछाक झाली. सरकार पक्षाने ११ साक्षीदार तपासले.

या केसमध्ये आरोपींच्या विरूद्ध सबळ पुरावा न आल्यामुळे जिल्हा सत्र न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.या खटल्यात आरोपींच्या बाजूने ऍड हनीफ शेख, यास्मीन शेख यांनी काम पाहिले. त्यांना ऍड. संदीप एस. कुटे यांनी सहकार्य केले.

या खटल्यातील आरोपी सराईत गुन्हेगारांर आहेत. त्यांची निर्दोष मुक्तता झाली असल्याने सर्वांना धक्का बसला आहे. दरम्यान, या खटल्यात सरकार पक्षातर्फे बाजू मांडणाऱ्या वकिलांनी या शिक्षेच्या निकालाविरूद्ध हायकोर्टात अपील करणार असल्याचे सांगितले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !