अहमदनगर - जिल्हयात मंगळवारी कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत 1 हजार 432 ने वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 5 हजार 926 इतकी झाली आहे. त्यामुळेे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक घेतली असून तालुकास्तरावर उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 327 खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 731 आणि अँटीजेन चाचणीत 374 कोरोना बाधीत रुग्ण आढळले. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 300, राहाता तालुक्यात 87 बाधित रुग्ण आढळले.
अकोले तालुक्यात 16, जामखेड 6, कर्जत 4, कोपरगाव 6, नगर ग्रामीण 56, नेवासा 21, पारनेर 61, पाथर्डी 19, राहुरी 13, संगमनेर 6, शेवगाव 12, श्रीगोंदा 16, श्रीरामपूर 53, कॅन्टोन्मेंट बोर्ड 11, मिलिटरी हॉस्पिटल 13, इतर जिल्हा 29, इतर राज्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येक तालुकास्तरावर कोवीड केअर सेंटर कार्यान्वीत करण्यात यावेत. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या पण लसीकरण न केलेल्या लोकांची संख्या काही तालुक्यांमध्ये जास्त आहे.