अहमदनगर - शहराला क्रीडा क्षेत्राची मोठी परंपरा आहे. ती पुढे चालू ठेवण्यासाठी नगरकरांना व्यासपीठ व सुविधा निर्माण करून देणे गरजेचे आहे. वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर राज्यस्तरीय ट्वेंटी ट्वेंटी आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आमदार संग्राम जगताप यांनी या स्पर्धेचे उद्धाटन केले.
अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, राजेश भंडारी, मयूर शेटिया, नगरसेवक विपुल शेटिया, आयोजक माणिक विधाते, अनुप संकलेचा, अमोल गाडे, वसीम हुंडेकरी, दत्ता गाडळकर, आदी उपस्थित होते.
माणिक विधाते व गणेश गोंडाळ म्हणाले, जिल्हा क्रिकेट असोसिएशनने ही राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. पुढचे १७ दिवस वाडिया पार्क येथे क्रिकेटचे सामने असतील. या स्पर्धेत राज्यातील ३२ संघ सहभागी झाले आहेत. विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक १ लाख रुपये मिळणार आहे.
तर उपविजेत्या संघाला ५१ हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक २१ हजार, मॅन ऑफ द सिरीज ११ हजार, बेस्ट बॅट्समन ५ हजार, बेस्ट बॉलर ५ हजार, अशी विविध पारितोषिके या स्पर्धेमध्ये ठेवली आहेत.
ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विनीत म्हस्के, अजय कविटकर, योगेश म्हस्के, रोहित जैन, संदीप पलघडपल, जुनेद शेख, संजय वाल्हेकर, संदीप आडोळे, प्रशांत आंतपेल्लू, अविनाश काळे, सागर खंडागळे, अंबादास जावळे, सार्थक खिस्ती, कृष्णा पठारे आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.