नाशिक - गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे "स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी, आली बाप्पाची स्वारी, आदर्श मंडळ होण्यासाठी, करूया जय्यत तयारी" यावर आधारित सार्वजनिक गणेश मंडळांसाठी उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार स्पर्धेचे आयोजन केले आहे.
सहभागी स्पर्धक गणेश मंडळांना प्रथम क्रमांकासाठी ५ लाख रुपयांचे राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी २ लाख ५० हजार, तर तृतीय क्रमांकाचे १ लाख रुपयांचे पारितोषिक असणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाच्या गणेशोत्सव मंडळास २५ हजार रुपयांची एकूण ३३ पारितोषिक देण्यात येणार आहेत.
सविस्तर माहिती व अर्जाचा नमुना www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२२ आहे. गणेश मंडळांनी अर्ज mahotsav.plda@gmail.com या मेलवर दाखल करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.