कधी स्पर्धा, कधी पाठीवर हात,
जगण्याच्या प्रवासात खुप माणसे भेटत असतात.
आपली होतात, जीव लावतात..
कटुता येते, कुणाचा हेवा असतो..
कुणाचा अभिमान आपला आनंद असतो,
ती पण कधी मान फिरवतात..
जी सहज भेटतात..
ती जीव ओवाळतात..
भीती वाटते आता वाटेची..
नको वाटतो रस्ता..
झाडातून आलेली वेलसुगंध देते.तर कधी फुलांचा सडा रांगोळी होते..आज आहोत उद्या नाही,असंच जगायचं असतं..हे माझं, ते माझं मानायचं नसतं..
कधी व्यक्त व्हायचं..
तर कधी अव्यक्त राहायचं असतं..
मनातलं फुल कधीच
कोमेजू द्यायचं नसतं..
कितीतरी मिळवताना निसटूनही गेले खूप काही...याला त्याला देता देता आपली झोळी भरून वाही..निंदा पचवून चालायचं असतं,अंधारात चाचपडताना,प्रकाशाला मात्र शोधायचं असतं ...!
- जयंत येलुलकर (अहमदनगर)